अपराधी मैत्रीचा

  • 7.6k
  • 2
  • 2.5k

नुकताच 12 वी science चा निकाल लागला होता,काय करावं,engeeneering करायचं होतं पण त्यासाठी एक परिक्षा देणं गरजेचं होतं,ती काही सूरज म्हणजे मीच,दिली नव्हती,मग आता एक वर्ष गॅप द्यायची का,???की दुसरं शिक्षण घ्यायचा असा मनात घोळ चालू होता,शिक्षक होण्याची आस,आणि इच्छा खूप लहानपणापासून होती,ती अजून काही पूर्ण झाली नाही,पण त्या वर्षी मी डी. एड.प्रवेश घेतला... नुकतंच कॉलेज सुरू झालं,मी आपला नियमितपणे कॉलेजमध्ये जाऊ लागलो,तसा आतापर्यंत मुलींचा संपर्क, आणि 12 वी पर्यंत मुलींसोबत मैत्री हे तर खूप दूर झालं, पण साधं बोलणंही माझ्याकडून होत नव्हतं,आता होत नव्हतं म्हणण्यापेक्षा तसा योग कधी आला नाही,आपलंच विश्व,आपलाच अभ्यास ,आपण बरं अस एकला चलो रे,आतापर्यंत