अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 32

(11)
  • 9k
  • 4.4k

शौर्य वॉशबेसिनमध्ये आपल्या शर्टावर पाणी टाकत कोल्ड्रिंक सांडलेला भाग तेवढा धुत असतो.. तोच त्याच लक्ष समोर असलेल्या मिरर मधून दिसणाऱ्या दरवाजाकडे जात.. कोणी तरी दरवाजाच्या फटीतून त्याच्याकडे बघतय अस त्याला वाटत. " रोहन तु आहेस का??" अस बोलत तो आपली मान पटकन मागे फिरवतो.. पण तिथे कोणीच नसत.. कदाचित मलाच भास झाला असेल अस बोलत तो ओल झालेलं शर्ट स्टीमर मशीन खाली धरत ते सुखवत असतो.. मनवी अशी इथे का उभी म्हणुन रोहन तिच्या मागुन येत तिला आवाज देतो.. रोहनने अस अचानक येऊन मागुन आवाज दिल्यामुळे ती थोडी दचकते.. रोहन : "अस घाबरायला काय झालं??" मनवी : "ते मी.. अ..