अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 31

(11)
  • 9.4k
  • 1
  • 4.5k

शौर्य आज दिल्लीला त्याच्या हॉस्टेलवर परतला.. हॉस्टेलवर पोहचेपर्यंत त्याला दुपार झाली.. रात्रभर विराज सोबत मस्ती केल्याने, त्याची झोप काही पूर्ण झाली नव्हती.. सामान तसच ठेवुन आहे त्याच कपड्यात तो बेडवर सरळ आडवा झाला.. पडल्या पडल्या त्याला झोपही सहज लागली. वृषभ, टॉनी आणि राज नेहमी प्रमाणे प्ले हाऊसमध्ये जायला निघाले असताना शौर्यचा दरवाजा त्यांना ओपन दिसतो.. राज : "शौर्य आला सुद्धा आणि आपल्याला एका शब्दाने त्याने सांगितलं पण नाही.." वृषभ : "नुकताच आला असेल.. आत जाऊन बघुयात साहेब काय करत आहेत ते.." तिघेही शौर्यच्या रूममध्ये घुसले.. शौर्य गाढ झोपेत होता.. मोबाईल चार्जिंगला लावलेला.. एकीकडे त्याची बेग तशीच पडलेली.. टॉनी : "हा