मित्रांचे अनाथाश्रम - भाग १४

  • 9.5k
  • 3.4k

रजनी, "मी ठरवलं आहे, आता जगायचं तर तुमच्याबरोबर, नाहीतर नाही जगायचंसांगा, करणार ना माझ्याशी लग्न ?"आत्तापर्यंत आनंदात असणारा मी रजनी जे बोलली ते ऐकल्यावर घाबरलो होतो. मी जे ऐकलं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. ती बोलली त्यानंतर मला चक्कर यायला लागले. मी तसा विचार सुध्दा केला नव्हता आणि तिच्या भावाने तिच्यासाठी स्थळ पाहिलं आहे. तिचं लग्न तिच्या भावाच्या पसंतीने होणार आहे. मी त्याबद्दल तिला सांगू पण शकत नाही. कारण ती आत्ताच मरण्याच्या धमक्या देते आहे. ती शांत व्हायला तयार नव्हती.रजनी, "बोला तुमचं काय मत आहे. हो असेल तर मी माझ्या दादाबरोबर बोलते आणि हरी देशमुख यांच्या मुलाला कुणी नकार देणार