चोकोबार

  • 6.6k
  • 2.2k

सहावीची परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळयाच्या सुट्टया लागल्या होत्या. आमच्या नेकनुर या गावापासून जवळच सात कि.मी. अंतरावर चाकरवाडी हे छोटेसे गाव आहे. त्याठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधीस्थ‍ळ व महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी दर अमावस्येला जत्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच इतर ठिकाणाहून भावीक दर्शनासाठी येतात.त्यावेळी आमच्या गावाहून चाकरवाडीला गाडीने जाण्यासाठी एक जणाला पाच रु. तिकीट होतं. अशाच एका अमावस्येला माझा मित्र चम्या आणी मी सकाळी लवकर उठून पहाटेच चाकरवाडीला चालत निघालो. कारण दोघांकडेही पाच-पाच रुपयेच होते. उन्हाच्या आधी चालत जायचं, आणी येताना गाडीने यायचं, असं आम्ही ठरवलं होतं. मधल्या कच्चा रस्त्यानं चालत-चालत आम्ही चाकरवाडीच्या शिवारात आलो होतो. मंदिराचा