अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 29

(11)
  • 9.4k
  • 1
  • 4.8k

पार्टी वरून शौर्य रूमवर निघुन आला. रोहनच्या वागण्याने त्याला खुप वाईट वाटलं होतं.. एवढा घाणेरडा आरोप रोहन माझ्यावर करूच कसा शकतो?? असा प्रश्न तो सारखा सारखा त्याच्या मनाला विचारत होता.. रोहन एवढं वाईट वागला शौर्यशी म्हणुन बाकीची मंडळी ही तिथुन निघाली.. समीराला सुद्धा रोहनचा खुप राग आला पण रोहनचा बर्थडे म्हणुन ती ही त्याला काहीही न बोलता सरळ पार्टी मधुन निघाली.. रोहन त्यांना थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत होता पण कोणीच थांबायला तैयार नव्हतं शिवाय मनवी.. तिला ह्या सगळ्या गोष्टीने फारसा काही फरक पडत नव्हता.. पण रोहनला त्याची चुक कळली होती. त्याच आता पार्टीत लक्षच लागत नव्हत.. शौर्यला भेटुन कधी त्याला सॉरी