बसस्थानकातील अमीतची टपरी म्हणजे गणेशच्या चार-पाच मित्रांचा लाईन मारण्याचा अड्डाच होता. अभ्यास करता-करता कंटाळा आला की, गणेश आंबट-चिंबट गप्पा ऐकण्यासाठी, बसस्थानकात येणाऱ्या पोरी पाहण्यासाठी त्यांच्यात सामील व्हायचा. अमीतची टपरी म्हणजे असं एक माहिती केंद्र होतं जिथे गावातल्या, गावाबाहेरच्या, राजकारणातल्या, लफडयांच्या सगळया गोष्टी माहिती व्हायच्या. एके दिवशी अमीतच्या टपरीत गणेश बसला होता. तेवढयात त्याला बस मधून कोणीतरी स्त्री उतरताना दिसली. तिचा चेहरा पलीकडे असल्याने त्याला तिचा चेहरा दिसला नाही. पण तिचं पाठमोरं सौंदर्य अप्रतिम होतं. एखाद्या कलाकारानं एखाद्या साच्यातून सुंदर लावण्यखणीची मुर्ती साकारावी तशीच त्या साच्यातील सुंदर मुर्तीच्या आकृती प्रमाणेच किंबहुना त्याहून सुरेख,रेखीव शरीर होतं तिचं. तिच्या अशा पाठमोऱ्या सौंदर्याने