अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 27

(13)
  • 9.9k
  • 1
  • 4.9k

पहाटे विराजला जाग आली... "शौर्य झोपायलाच आला नाही का??" विराज स्वतःलाच प्रश्न विचारू लागला.. मोबाईल मध्ये बघितलं तर चार वाजुन गेलेले.. डोळे चोळतच तो उठला.. गेलरीत बघितलं तर शौर्य तिथेच डोकं टेकुन झोपलेला.. मोबाईल त्याच्या बाजुलाच पडलेला.. विराजने मोबाईल उचलुन नीट ठेवला.. आतुन उशी आणि चादर आणली.. शौर्यच डोकं उशीवर ठेवत त्याच्या अंगावर चादर घालून तो आत निघुन आला.. जवळपास आठ साडे आठ वाजता शौर्यला जाग आली.. स्वतःला अस गेलेरीत झोपलेला बघुन त्यालाच नवल वाटलं.. "विरsss", शौर्य विराजला आवाज देत होता.. विर कानात इयरफोन घालुन कोणाशी तरी फोन वर बोलत होता.. त्यामुळे शौर्यचा आवाज त्याला आला नाही.. शौर्य उठून सरळ