काटेरी फुलांचा ताज

(13)
  • 7.4k
  • 2
  • 2.3k

मुकेश! फॅशन इंडस्ट्री मधले नामांकित नाव, त्याच्या शोमध्ये मॉडेलिंग करायला मिळावं हे प्रत्येक मॉडेलचे स्वप्न आज माझ्याबाबतीत खरे होत होते. खूप खुश होते मी आज. तशी मी दिसायला छान होते आणि माझ्या नशिबाने माझा मेकअप करणारा प्रकाशपण खूप चांगला असल्याने त्याने मन लावून माझ्या चेहऱ्यावर केलेल्या रंगरंगोटीमुळे आणि छान केशरचनेमुळे आज मीच माझ्या प्रेमात पडले होते. माझे सगळे आवरून झाल्यावर आरश्यात स्वतःलाच न्याहाळत असताना अचानक शो सुरू व्हायच्या 5 मिनिट अगोदर सगळ्या मॉडेल्स ना एका रांगेत उभे राहायला सांगितले होते. कोणाला काहीच माहीत नसल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता पण मुकेशच्या शोमध्ये तो सांगतो तेच करायला लागत असल्यामुळे सगळे शांत होते.