‘वन अधिकारी’ या पदावर अमरची नक्षलग्रस्त जिल्हयामध्ये नुकतीच नियुक्ती झाली होती. या भागामध्ये वन्य प्राण्यांची मोठया प्रमाणावर तस्करी होत होती. वनाचं आणी प्राण्यांचं तस्करांपासून रक्षण करणं फार जोखमीचं काम होतं. पण कोणतीही जोखीम घेवून वन देवतेला आणी तिच्यामध्ये वास करणाऱ्या प्राण्यांना वाचवण्याचं अमरने मनोमन ठरवलं होतं. जंगलाच्या बाजूला आदिवासी लोकांचे पाडे होते. आदिवासींना जंगलाचा कोपरान्-कोपरा माहित होता. जंगलात फिरण्यासाठी अमरला त्यांची खुप मदत व्हायची. नदीच्या पाण्यात सुर मारुन वेगानं पोहणं, कामटयांचे बाण करुन नेमबाजी करणं, तसेच भाला फेकून आपलं लक्ष अचूक साधणं या कलाही अमर त्यांच्याकडून विपरीत प्रसंगी कामाला येईल म्हणून शिकला होता. एके दिवशी अमर जंगलात भटकत असताना,