समीराला मनवीच्या बोलण्यावर काय रिएक्शन द्यावी हेच कळत नव्हतं.. सीमा : "समीरा तु तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस.. तुझ्यासाठी दादाच लग्न महत्वाचं आहे. आपण शौर्यशी भेटुन बोलु नक्की काय भानगड आहे ते कळेलच आपल्याला.." समीराला सीमाच बोलणं पटत.. एक खोल श्वास घेत तिने रडु आतल्या आतच कुठे तरी दाबुन टाकलं.. "पाणी घे..", बाजुलाच असणाऱ्या वेटर कडुन सीमा ने पाणी घेत समीराला दिल.. पाणी पिऊन तिला थोडं बर वाटल.. "आर यु ओके..??", सीमाने तिला काळजी पोटी विचारल.. "शौर्य अस कसं वागु शकतो?? समीरा स्वतःलाच प्रश्न करत असते. समीराच लक्ष मात्र आता लग्न समारंभात लागत नव्हत.. त्याच त्याच पाहुण्याला ती पुन्हा पुन्हा