शौर्य खुप घाबरून गेला होता.. वरातीच्या गर्दीतील माणसांमध्ये लपुनच तो आत शिरला.. आत शिरताच जेवण बनवण्यासाठी एक खोली त्याच्या नजरेस आली.. क्षणाचाही विलंब न करता तो त्या खोलीत शिरला.. शौर्य अस लपुन छपुन कुठे चाललाय?? म्हणुन मनवी ही त्याच्या मागे त्याला बघायला त्या रूममध्ये शिरली.. शौर्य लपायला कुठे जागा मिळते का बघु लागला.. तोच भिंतीच्या कडेला टेकुन ठेवलेला भला मोठा पाण्याचा ड्रम त्याला दिसला.. ड्रम आणि भिंत ह्यांच्या मधोमध असलेल्या फटीत शिरून तो लपून बसला.. इथे अस किती वेळ त्याला लपुन रहावं लागेल हे त्याचं त्यालाच माहीत नसतं.. हृदय मात्र जोरात जोरात धडधडत होते.. अनिताचे शब्द आठवुन त्याला आता जाणवलेल