अधांतर - १९

  • 7.9k
  • 1
  • 2.9k

"इतना आसान नही, अपणे तरीकेसे जिना, अपनोको ही, खटकती है मनमर्जी हमारी।" कुठे तरी वाचलं होतं हे, कोणी लिहिलंय माहीत नाही...पण, नुसतं वाचायला छान वाटलेलं वाक्य खर ही होऊ शकते याची अनुभूती मला आता माझ्या आयुष्यात येत होती...जोपर्यंत मी सगळ्यांच्या गोष्टी काळ्या दगडावरची रेष म्हणून डोळे झाकून मान्य करत होती तोपर्यंत सगळं ठीक होतं, घरचे आणि नवरा बोलेल ती पूर्व दिशा असं समजत होती तेंव्हा मी अगदी आदर्शवादी होती...पण स्वतःच्या माकलीच गहाण ठेवलेलं आयुष्य जेंव्हा स्वतःच्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मात्र मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झाली, अचानकपणे माझे संस्कार, माझे आदर्श, इतकंच काय तर माझं चरित्र ही चुकीचं झालं...वाह