अधांतर - १५

  • 6.8k
  • 2.7k

खोया था क्या जो, आज मिलने लगा है? उम्मीदों के उजालों मे, खुशी का साया निकला है। हरवलेलं नक्कीच सापडतं असं म्हणतात, मला याची प्रचिती येत होती अभय सरांना भेटून... त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या सहवासात मला ही वाटत होतं जो आत्मविश्वास मी कुठेतरी मागे सोडून आली होती तो आता मला पुन्हा नव्याने गवसतोय...तस लहानपणापासूनच घरच्यांनी खूप 'प्रोटेक्टिव्ह' वातावरणात ठेवलं त्यामुळे कधी लोकांच्या दुःखाशी किंवा त्यांच्या अडचणींशी जास्त गाठ पडलीच नाही...आणि तसही आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात हेच शिकवतात की आपण भलं आणि आपलं काम भलं...त्यामुळे हे कोणाला जाऊन मदत करणं किंवा कोणाला शिकवणं हे समाजकार्य कधी केल्याच गेले नाहीत...जेंव्हा मी अभय सरांच्या NGO