तू ही रे माझा मितवा - 24

(18)
  • 12.7k
  • 5.7k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२४ (#ऋतू)“वेद आजच्या भेटीचं कारण फक्त तू लिहलेलं मितवा काय आहे हे जाणून घेणं एवढंच नाहीये तर मला एका अनोळखी वाटेवर भेटलेल्या मितवाविषयी...rather एका ‘सहेलाविषयी तुला सांगायचं आहे.”“तुला भेटलेला मितवा? I am not getting it,केव्हा? कुठे?” जेवढा धक्का त्याला ऋतूच्या हातात मितवाचे कागद बघून लागला नाही त्याच्या जणू चौपट धक्का ‘कुणी मितवा’ तिला भेटला ह्या विचाराने लागला.“खरतरं तुझ्या ह्या गोष्टीला..माफ कर आपल्या ह्या तू लिहलेल्या लव्हस्टोरीला तू ‘मितवा’ का नाव दिलं मला माहित नाहीत नाही, मला हे ही माहित नाही की तू मितवाची काय व्याख्या केली पण माझ्यासाठी