तू ही रे माझा मितवा - 21

(14)
  • 11.6k
  • 1
  • 5.6k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२१तिने तिरमिरीत वेद्चा नंबर डायल केला पण वैतागून लगेच कट केला.“काय विचारू त्याला? तुझ्या रूमवरून माझ्यापर्यंत पोहचलेले हे पेजेस कसले? आपल्यात जे कधी झालं नाही ते का आहे त्यात?” विचार करून ती वैतागली. “मे बी त्याच्या त्या रिसोर्टच्या प्रोजेक्टचा पुढचं स्क्रिप्ट असेल काही किंवा तो आता काम करत असलेला प्रोजेक्टचा भाग असेल किंवा त्याच्या डायरीची पानं असतील निशांत नावाने लिहित असेल,मे बी ...stop it yaar मी काय काय विचार करतेय..आणि ही सोनाली म्हणजे मीच ना? काल अभय पण सोनाली असंच म्हणाला,वेद काही लपवतोय का? आणि तू ? तू पण कबीरसोबत आलीस ते लपवलंच आहे ना त्याच्यापासून?