#तू_ही_रे_माझा_मितवा#भाग_19कधी हिरवीपिवळी माळरानं,कधी सिमेंटचं जंगल,कधी वाहनांच्या गराड्यात तर कुठे मोकळा रस्ता,कधी ट्राफिक जॅमचा वैताग, घड्याळाचे काटे पुढे सरकत होते,रस्ता मागे पडत होता.उन्हं कलायला सुरुवात झाली होती.“तुझी हरकत नसेल तर एक काम करायचं होतं?” कबीर म्हणाला.“काय?” “पुढे अर्धा तासावर सयगाव आहे ना तिथे मावशीचं फार्महाउस आहे, काही समान ठेवायचंय actually जातांनाच ठेवायचं होतं पण तेव्हा कंटाळा केला ,if you permit.जास्त वेळ लागणार नाही प्रॉमिस.” “ माझी परमिशन का घेतोय? गाडी तुझी,लिफ्ट तू मला दिलीय, as you wish..” “अरे एकदम मस्त फार्महाऊस आहे आणि तिथला केयर टेकर ‘टिकटॉक’ त्याने बनवलेला चहा म्हणजे एकदम भन्नाट! फ्रेश होऊ,चहा घेऊ आणि लगेच निघू.” “टिकटॉक? असंही नाव असतं?” तिला हसू