शेवटचा क्षण - भाग 36

(11)
  • 8.2k
  • 3.7k

गार्गीच्या वडिलांनी प्रतिकला गार्गीच्या घरून सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितलं.. आणि तसच घरी सुद्धा फोन करून कळवलं.. त्यानेही लगेच सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं.. गार्गीच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने सगळ्यांना गौरवच्या अकॅसिडेंट बद्दल सांगितलं.. ते ऐकून सगळ्यांच्या शरीरातील त्राण च निघून गेला.. काही क्षण कुणीच काही बोललं नाही पण गार्गीच्या सासूला अनावर झालं.. आणि "हे खरं नाही, अस नाही होऊ शकत माझा मुलगा आणि सून दोघांनाही देव अस मरणाच्या दारात उभं नाही करू शकत, काय दोष आहे या निष्पाप जीवाचा की तिच्या आई आणि वडील दोघांचीही अशी स्थिती आहे.. आईसाठी केवढी तळमळते आहे पोर.. बाबा येणार आहे म्हणून केवढी खुश होती ती.. नाही