शेवटचा क्षण - भाग 33

  • 8.6k
  • 3.5k

आज सकाळी सकाळीच गार्गीला प्रतिकचा फोन आला.. प्रतीक - हॅलो, गार्गी.. गार्गी - हॅलो, बोल प्रतीक.. आज अचानक कसं काय कॉल केला??प्रतीक - तू घरीच आहे ना आज? मी येत होतो पत्रिका घेऊन तुझ्या घरी..गार्गी - नाही प्रतीक तू अस कर ना मला पत्रिका व्हाट्सअप्प करून दे, मी बघते ते ... मी जरा गावी आलीय.. थोडं काम होत तर.. आणि इकडेच थांबणार आहे काही दिवस.. तर तू नको येऊ.. प्रतीक - ओहह, ठीक आहे मी पाठवतो तुला व्हाट्सअप्प वर पत्रिका.. खरंतर मला तुला एकदा भेटायचं होतं.. पत्रिका तर फक्त बहाणा होता.. आणि तू साखरपुड्याला पण नाही आली..गार्गी - ठीक आहे नंतर भेटू,