शेवटचा क्षण - भाग 26

  • 7.6k
  • 4.1k

पुढे गौरव आणि गार्गी आनंदाने सोबत राहू लागले.. सोबतच आता गौरवचे आई वडीलही इकडेच कायमचे राहायला आले होते.. त्यामुळे घरात दोघांच्या अगदी बिनधास्त आणि बेधडक वावरण्यावर थोडासा प्रतिबंध लागला.. पण गार्गीचा दिवसभरचा घरात जाणवणारा एकटेपणा दूर झाला.. गार्गी त्यांच्या सोबत आदराने वागायची.. मुळातच बोलका स्वभाव असल्यामुळे गार्गी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करायची.. त्यामुळे त्यांनाही बोर होत नसे आणि गार्गीलाही करमायचं..तसही आता गार्गीने आपल्या भावनांना कसं लपवायचं शिकून घेतलं होतं, त्यामुळे तीच्या मनाची अवस्था आता गौरवला कधीच कळत नव्हती.. तिला प्रतिकची अनेकदा आठवण यायची पण तस कधीच तिने गौरवला जाणवू दिलं नाही.. ती खुश आहे आणि कदाचित प्रतिकला विसरत आहे असाच