खरं समाधान...

  • 8.6k
  • 2
  • 3k

खूप दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींना आज भेटणार याची एक वेगळीच उत्सुकता मनाला लागली असतानाच, दुसरीकडे मात्र मी फक्त एक गृहिणी असल्याचं सत्य समोर आलं आणि काही वेळ सोफ्यावर तसेच पडून, विचार करत बसले..... काहीच वेळात मनातल्या त्या विचारांना ब्रेक लावणारा एक आवाज कानावर पडला आणि बघितला तर, कॉल होता माझ्या मैत्रिणीचा..... मी : "हो बोल ना....☺️" ती : "निघालीस का.... पीक करू तुला मी?" मी : "अग कशाला.... येते मीच.... हे काय निघते आहे लगेच" ती : "अग थांब ग.... कुठे तू ऑटो ने येणार.... मीच येते तुला पीक करायला माझी कारररर घेऊन...?" तिच्या कार चे कारररर ऐकून मनात भीती