मिले सूर मेरा तुम्हारा - 5

  • 9.6k
  • 3.8k

“काऽय?”आता जीभ चावायची वेळ वृंदाची होती. कारण निनाद ब-याच वेळा उशिरा घरी येत असे आणि वृंदा देखील कधी फोन करुन तो कधी येणार हे विचारत नसे.“मी माझ्यासाठी चहा घेऊन येते.”,असं म्हणून वृंदाने बोलणं टाळलं.दोघांनी मग चहा आणि भजी वर मनसोक्त ताव मारला. निनादची नजर तिच्यावरुन हटतंच नव्हती. “काय झालेय सांगशील का?”,निनाद ने पुन्हा एकदा न राहवून तिला विचारले. यावर वृंदा पुन्हा किचन मध्ये गेली. तिला असं जाताना बघून निनाद तिला पाठमोरा बघत राहीला. थोड्याच वेळात हातात एक केक आणि औक्षणाचं ताट घेऊन वृंदा बाहेर आली. तिने केक आणि ताट टिपॉय वर ठेवलं.“पण आज तर माझा वाढदिवस नाहीये.”“हो पण माझा तर आहे