मित्रांचे अनाथाश्रम - भाग १२

  • 8.5k
  • 3.1k

सुरेश काकांनी सांगायला सुरुवात केली,पंचवीस वर्षापूर्वी,मी कामावर होतो, तेव्हा जास्त टीव्ही वैगरे नव्हतं. म्हणून जगात काय घडतं आहे ते कुणाच्यातरी तोंडून तीन चार दिवसांनी समजायचं. मी कामात असताना एक माणूस पळत आला आणि जोरात ओरडला, "बाहेर दंगल झाली आहे." कशामुळे घडलं, काय घडलं, काही माहिती नव्हतं पण जीव वाचवण्यासाठी लपून बसलो. त्या वेळी दंगल मुळे कित्येकांची घर उध्वस्त झाले. रात्री शांतता पसरली तेव्हा कुठूनतरी मार्ग काढत मी कामावरून घरी आलो. दरवाजा वाजवणार तेव्हा समजले की दरवाजा उघडा आहे. मी आत शिरलो तर सगळीकडे रक्त आणि फक्त रक्त होते. त्या रक्त्याचा पाठलाग करत मी पुढे पुढे जात होतो तसे माझ्या हृदयचे