मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११

  • 9.2k
  • 3.5k

विवेक ने बाटली फिरवली.विवेक समोर बाटली येऊन थांबली, तो उभा राहिला आणि सर्वांवर एक नजर फिरवून बोलला, "विचारा काय विचारायचं ते ?"सुरेश काका, "याला मी विचारणार"विवेक, "विचारा"सुरेश काका, "संजयला संध्या आवडते तशी तुझी आवडती स्त्री कोण आहे ?"विवेक हसून, "आई"मी, "ओ साहेब, स्वामी विवेकानंद नको बनू, खर काय ते सांग"विवेक, "काकांनी प्रश्नच तसा विचारला"काका, "मग दुसरी सांग ?"विवेक हसत खाली बसतांना बोलला, "एकच प्रश्न विचारायची अट होती"विवेक ने पुन्हा बाटली फिरवली, यावेळी संजय वर वेळ आली. तो उभा झाला आणि म्हणाला, "कोण विचारणार"आम्या, "मी विचारतो"विवेक, "काहीतरी माहिती मिळेल असं विचार"आम्या, "संध्यासाठी काय सरप्राइज आहे ?"संजय, "अरे देवा, मला वाटल काय अवघड विचारतो