अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 24

(17)
  • 9.1k
  • 1
  • 4.8k

( मागील भागात आपण पाहिलात की.. शौर्य ब्रूनोला भेटायला जातो.. विराजच्या नकळत शौर्य ब्रूनोला भेटतो. खुप दिवसांनी शौर्य दिसल्याने ब्रुनो त्याच्यावर भुंकून आपलं प्रेम व्यक्त करतो. ब्रुनोच्या आवाजाने विराज त्याला शोधायला जातो.. झाडाच्या पलिकडून ब्रूनोचा आवाज येत असतो.. विराज ब्रूनोला शोधत पूढे जातो..आता पुढे.) "Excuse me.." विराज झाडाच्या आड जाणार तोच वृषभ ने त्याला थांबवतच म्हटले..विराज : "yes"वृषभ : "मला हा एड्रेस सांगता का जरा.. Please..."विराज वृषभच्या हातातला कागद घेतो आणि त्यातला एड्रेस बघतो आणि तो वृषभला काही सांगणार.. तोच मोठं मोठ्याने ब्रुनो भुंकण्याचा आवाज तिथे येतो.. विराज हातातील कागद तसाच पकडत ब्रुनोच्या आवाजाकडे धाव घेतो.. शौर्य रोहनच्या मागे बाईकवर बसलेला असतो..