अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 22

(13)
  • 9.9k
  • 1
  • 5.1k

"व्हॉट सरप्राईज आहे शौर्य.. कधी आलास तु इथे?? काल तर माझ्याशी बोललास पण सांगितलं नाहीस की तु इथे आलास ते आणि आंटी सुद्धा काही बोलल्या नाहीत.. आणि आता तर....", ज्योसलीन आनंदाच्या भरात बोलत होती.."ज्यो किती प्रश्न करतेयस..???एखादा प्रश्न करून शांत बसलीस की मी उत्तर देईल ना..", ज्योसलीनला थांबवतच शौर्य बोलला..ज्योसलीन : "तु कधी आलास इथे ते सांग.."शौर्य : "मी आज सकाळीच आलोय इथे आणि मॉमला काहीच माहीत नाही ह्याबद्दल.."ज्योसलीन : "ओहहह! आंटीला पण सरप्राईज देणार वाटत."शौर्य : "तस नाही ग".."शौर्य आमची पण ओळख करून देना.. मला पण ओळख करून घ्यायला आवडेल", समीरा दात चावतच आणि थोडस खोट हसु चेहऱ्यावर आणत