अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 21

(12)
  • 10.3k
  • 5.1k

शौर्य मुंबईत न येण्यासाठी कारण शोधत होता.. मित्र मंडळींना काय सांगाव हे त्याला कळतच नसत..राज : "अरे बोल तरी.. कधीच ती विचारतेय..."शौर्य : "समीरा..ते माझा पाय..."समीरा : "दोन दिवस आधीच बोललासना बरा झालाय म्हणून आता...."शौर्य : "हो तेच सांगतोय.. आता पाय बरा झालाय.. पण.. मुंबईला..??"मनवी : "आता काही कारण नको हा.. आपण सगळेच जाणार आहोत.."वृषभ : "अग पण त्याला काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ना.."मनवी : "तुला काय माहीत त्याला प्रॉब्लेम आहे ते?? आणि आता तर तयार झालेला तो.."वृषभ : "तेव्हा मुंबईला लग्न आहे हे कुठे माहीत होतं.."समीरा : "पण आत्ता माहीत आहेना.. तस पण शौर्य तु तर मुंबईचाच आहेस ना मग