मुलगी होणं सोपं नाही - 8 - आयुष्याला वळण....

  • 5.3k
  • 1
  • 1.8k

डॉक्टरांच्या तोंडुन आजीचं असं झाल्याचं ऐकुन माईला धक्का बसला होता, तीला बोलताही येत नव्हतं, ताई मला मिठी मारुन रडत होती. ताईने स्वतःला सावरण्याचा खुप प्रयत्न केला. कारण आजी गेल्याचं सांगितल्यानंतर मामा इकडे येईल याची काहीच कल्पना नव्हती. पण आमच्यासोबत ते ड्रायव्हर काका थांबले होते. त्यांनी तरीही मामाला फोन केला आणि फोन मामीने उचलला.. काकांनी आजीबद्दल मामीला सांगितले, मामीने हो बोलुन फोन ठेवुन दिला. आम्ही बराच वेळ मामाची दवाखान्यात वाट बघितली पण मामा काही आला नाही. आत्ता ह्या लहान मुली काय करतील??? आजीचं अंत्यसंस्कार कोण करणार?? हे प्रश्न काकांना पडले होता. त्यांनी आमच्या शेजारच्या काकुंना फोन करुन आजीबद्दल सांगितले."तुम्ही लगेच आजींना