प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 3

  • 7.3k
  • 4k

ट्रीपवरुन घरी येताच मेघनाने मारलेली मिठी आठवुन राघव गालातल्या गालात हसतो. रात्रीचे दोन वाजुन गेले तरी राघव जागा असतो नंतर उशिरा त्याला मेघनाच्या आठवणीत झोप लागते. दुसऱ्या दिवशी मेघना नेहमीपेक्षा लवकरच कॉलेजमध्ये येते. पण तिला राघव कुठेच दिसत नव्हता.. कॉलेजमध्ये गोंधळ चालु असतो. नोटीस बोर्डभोवती गर्दी असते. "एवढ्या गर्दीतुन कळणार कसं की कसली नोटीस आहे??" जिया तोंड पाडतच मेघनाला बोलते. "गर्दी कमी झाली की बघुयात", मेघना तक्रारीवरचा तोडगा काढत जियाला बोलते. तोच गर्दीतुन राघव आणि श्री बाहेर येताना तिला दिसतात.. "ह्ये राघव ! कसली नोटीस लागलीय?”, जिया राघव दिसताच त्याला विचारते. "कॉलेज थ्रू इंटरडान्स कॉम्पिटीशन आहे. जो कोणी इंटरेस्टेड असेल