मी चुकले का?

  • 10.3k
  • 3.1k

आज परत आम्ही नेहमीप्रमाणे भेटणार.... जागा तीच जिथे नेहमी भेटतो.... "तो"...... हो हो माझा "तो"..... आम्ही गेली सहा वर्ष आहोत सोबत.... त्याने खूप समजून घेतलंय मला..... आता जीवनातील खूप महत्त्वाचा निर्णय घरच्यांना सांगायचं म्हणून, आधी आमच्यात तो प्री प्लॅन्ड असला पाहिजे की नाही....! म्हणूनच भेटत आहोत आज..... कुठला ड्रेस घालावा???? किती कन्फ्युजन राव..... नेहमी पेक्षा आज मनात धाकधूक वाटतेय.... का असावी याचं उत्तर शोधायला वेळही नाही..... असो... घालते तोच ड्रेस ज्यात त्याला मी एका नजरेत पसंत पडले होते.... शेवटी लग्न करतेय त्याच्याशी.... मग त्याच्यानुसर, त्याला आवडेल ते करूनच मला आनंद मिळेल नाही का!?.... चला तयारी झाली निघालं पाहिजे.... उशीर झालेला