मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०

  • 9.5k
  • 3.5k

मी, "मग कुणी सांगितले ?"संजय, "निशा, संध्याची मैत्रीण"मी, "कधी ?"संजय ने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली,त्या दिवशी आपण चौघेही आश्रमात गेलो होतो. तेव्हा संध्याला सुरेशकाकांनी तिच्या बाबांबद्दल विचारले. त्यानंतर संध्या रडायला लागली. तेव्हाच तिला बोलता येत नाही हे कळाले. संध्याला पुन्हा त्रास नको म्हणून तो विषय पुन्हा कुणी घेतला नाही. त्या रात्री उशीर झाला होता आणि विवेक पण काहीतरी काम होत म्हणून लवकर निघून गेला. संध्याला हॉस्टेल ला सोडायला मी आणि आम्या दोघं गेलो. नेहमीप्रमाणे आम्या ने संध्याकडून गाडीची चावी मागून घेतली आणि मी संध्याला माझ्याबरोबर घेतले. रस्त्यात एका बाजूला एक छोटीशी दरी होती आणि त्यात खुप काटे होते म्हणून