लहान पण देगा देवा - 17

  • 5.4k
  • 2.1k

भाग १७ आणि शेवटी तेच झालं अथर्व च्या आई बाबांचा मोर्चा हा आजी आजोबांकडे वळला. त्यांनी त्याचं एकहि ऐकलं नाही, आणि खूप काही बोलू लागले, ते विसरून गेले कि, ते त्यांच्या आई वडिलांसोबत बोलत आहेत. त्यांचे शब्द इतके टोकाचे होते कि, आजी आजोबाना होणारा त्रास त्यांना दिसत नव्हता. आणि त्यांना त्या गोष्टीचा फरक देखील पडत नव्हता. इतक टोकच बोलत होते कि, आजोबांना त्रास होण्यासाठी सुरुवात झाली होती. तितक्यात अथर्व तिथे पोहोचला, आणि आजोबांची अवस्था पाहून त्याने लगेच साक्षीला फोन केला. तो पर्यंत अथर्व आजोबाना रूम मध्ये घेऊन गेला, आणि इकडे वडिलांची हि अवस्था पाहून अथर्व च्या आई वडिलांचा