तू ही रे माझा मितवा - 13

  • 9.7k
  • 1
  • 5.3k

#तू_ही_रे_माझा_मितवा ?????#भाग_13गोवा म्हणजे फ्रीडम,गोवा म्हणजे सुशेगात भटकंती आणि गोवा म्हणजे रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला दिलेलं एक रॉ कीस..!सगळ्यांसाठी गोव्यातला दुसरा दिवस देखील स्कूटीवरून मनमुराद भटकून,पबमध्ये थिरकून मजा मस्ती करण्यात गेला.नाश्ता आणि जेवायच्या वेळेला रेवाने ऋतुजाच्या लक्षात येईल बरोबर अश्या पद्धतीने वेदला काय खायचं,काय नाही ह्याबद्दल वॉर्न केलं.ऋतूने ह्यावेळी दुर्लक्ष केलं तिला ह्या रंगीत वातावरणात काहीही किल्मिष नको होती.रात्र झाली तशी क्लोजग्रुपमध्ये असणाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे प्लान्स बनवले होते. जरा फ्रेश होऊन,चेंजकरून सगळे हॉटेलच्या रेस्ट्रोबारमध्ये भेटणार होते.ऋतू आणि सौम्यादेखील त्यांच्या रुममध्ये आल्या. शॉवर घेऊन ऋतू अगदी फ्रेश झाली होती.हेयर ड्रायरने केस वाळवत असताना कालची संध्याकाळ आठवून तिच्या ओठंवर हसू उमललं.सौम्याच्या नजरेतून ते सुटलं