तू ही रे माझा मितवा - 12

  • 10k
  • 1
  • 5.4k

#तू_ही_रे_माझा_मितवा ????#भाग_12#VidaMar रिसॉर्ट ” ह्या प्रायव्हेट बिच प्रॉपर्टी समोर गाडी थांबली. एकच गलका करत सगळे बाहेर आहे.दोघे तिघे तर पहिल्यांदाच गोव्याला आल्याने अगदीच हरखून गेले होते.खुश होते. बागा आणि कलंगुटच्या मध्ये कुठेतरी असणारी प्रशस्त प्रॉपर्टी.समोर तीनचार टप्प्यात असलेली विस्तीर्ण बाग, पुढे लांबच लांब पसरलेला पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा,शाळकरी पोरांच्या शिस्तीने ओळीत मांडलेल्या shack, थोडं बाजूला पाच ते सहा वेताचे अँटिक टेबल आणि सोफा आणि निळाशार अथांग सागर..शांतता असल्याने समुद्राची गाज हलकीशी का असेना पण ऐकू येत होती. प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याने अगदी तुरळक लोक तिथे होते.“वेलकम टू VidaMar” गोरा रंग,बरगंडी कलर केलेल्या केसांचा छोटा बन,उजव्या भुवईवर असलेल पिअरसिंग,छोट्या चणीच्या एका मुलाने हसत सगळ्याचं स्वागत