प्रेमगंध... (भाग - १४)

(12)
  • 11.8k
  • 5.7k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजय- "राधिका... तू मला खूप आवडतेस... लग्न करशील का माझ्याशी...?" दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या... थोडा वेळ दोघीही चेहर्‍यावर काहीही हावभाव न आणता शांतच उभ्या होत्या. अजयला तर चांगलाच घाम फुटला होता. तो खुप घाबरला होता... तो मनातच विचार करत होता की आता राधिका चिडेल आणि रागाने निघून जाईल... त्याने खिशातून रूमाल काढला आणि चेहर्‍यावरचा घाम पुसू लागला... त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती... तो राधिकाच्या बोलण्याची वाट बघत होता... आता पुढे...) राधिका- "अजय, मला अजिबात वाटलं नव्हतं की माझ्याबद्दल तू असा काहितरी विचार करत असशील... मी तुला किती चांगला मित्र समजत होती रे आणि किती विश्वास