प्रेमगंध... (भाग - ११)

(11)
  • 12.6k
  • 1
  • 6.2k

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयच्या बाबांना बारशात यायला उशीर होतो. त्यांना बघुन अमृता, अजय, अर्चनाचा नवरा त्यांच्याजवळ येतात... बाबा त्यांच्याकडे, बारसं कसं झालं याची सगळी चौकशी करतात. समर्थ त्यांना "आजोबा" आवाज देत धावतच येतो. बाबा त्याला उचलून घेतात आणि त्याच्या दोन्ही गालावर पप्पी देतात. आणि त्याला घेऊन सगळे जेवायला जायला निघतात. आता पुढे...) राधिका शाळेतल्या शिक्षकांसोबत गप्पा मारत उभी होती. तिने अजयच्या बाबांना समर्थला उचलून घेऊन येताना पाहिलं. त्यांच्यासोबत अजयच्या घरचे सगळेच होते. तिने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. "कंडक्टर काका अजयच्या फॅमिलीसोबत कसे काय...?" असं ती मनातच विचार करू लागली. आणि त्यांच्याकडे पाहतच होती, त्याचवेळी अजयच्या बाबांचं पण तिच्याकडे लक्ष