सिरत नही, हमेशा, सुरत देखता है। इसिलिये शायद, प्यार अंधा होता है। प्रेम ! जगातल्या सगळ्या प्रकारच्या भावनांचा कल्लोळ एकीकडे आणि प्रेम ही भावना एकीकडे...अस म्हणायला हरकत नाही की या दुनियेत प्रत्येक भावनेचा उगम प्रेमातून झाला आहे...आणि माझं स्पष्ट मत आहे की बहुतांश वेळा प्रेम हे समोरचा व्यक्ती कसा दिसतो यातून निर्माण होतं...पण ते प्रेम नसतंच मुळी... ते आकर्षण असत ज्याला आपण प्रेम समजतो...आणि खूप वेळा या आकर्षणाला बळी पडतो...कोणचा स्वभाव समजून घेणं, त्याचे विचार समजून घेणं ही नंतरची गोष्ट पण सुरुवात तर दिसण्यावरूनच होते ना...आणि इथेच घात होतो...प्रेमाची परिभाषा समजून घेण्यासाठी खूप परिपक्व व्हावं लागतं, आणि यासाठी महत्त्वाचा असतो