"समीरा ते.. कस सांगु तुला?? मला नाही कळत.. तु समजतेस तस नाही आहे ग..",शौर्य थोडं घाबरतच बोलततो.. "म्हणजे?? तुझी फायनान्शियल परिस्थिति ठिक नाही ना??म्हणुनच तु डेटा एन्ट्री करत असतोसना??",समीरा थोडा गंभीर चेहरा करतच त्याला विचारते. शौर्य नकारार्थी मान हलवत नाही बोलतो.. समीरा : "एक मिनिट.. तु तर बोलला होतास की तू डेटा एन्ट्री करतो म्हणुन.." शौर्य : "मग त्याचा अर्थ असा नाही ना होत की मी गरीब आहे किंवा माझा तु बोलतेस फायनसीयल प्रॉब्लेम आहे.." समीरा : "मग तुझ हॉस्पिटलच बिल रोहनने का भरलं??" शौर्य : "तुला कोण बोललं माझं बिल त्याने भरलं??" समीरा : "ते मला वाटलं कारण जेव्हा