दृष्टिकोन - भाग 1

  • 7.2k
  • 3.8k

---------------------------------------------------- दृष्टिकोन भाग 1 - अनपेक्षित ---------------------------------------------------- " समीरsss तिकडे काय करतोय ? इकडे ये... " एका मुलाने लांब एका कारजवळ फोन चालवत उभ्या असणाऱ्या समीरला हाक मारली....समीरने आवाजाच्या दिशेने पाहिले...लांबून त्याचा मित्र सोहम आणि त्याचे इतर मित्र मैत्रिणी गप्पा मारत उभे होते...समीर मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा फोनमध्ये पाहू लागला.. " काय यार , तू पण " सोहम त्याच्याजवळ घाईघाईने येत बोलत होता..." त्या जुनेजा सरांना तू का एवढा सिरियसली घेतोय , त्याला दुसरे काही काम नाहीये " सोहम समीरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला...समीरने किंचित रागाने त्याच्याकडे पाहिले..सोहमच्या चेहऱ्यावर मात्र हास्य पसरले...समीरने मोबाईल फोन खिशात