अग्निदिव्य - भाग ४

  • 9.2k
  • 3k

अग्निदिव्य विशाळगडावर राजांनी राजसदरेवर सरनोबत नेतोजी पालकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. सरनोबत पदाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. राजांना मुजरा न करताच गर्र्कन नेतोजी मागे वळले अन ताडताड चालू लागले. सदरेवरच्या पायऱ्या उतरले अन मागे वळून राजांकडे पाहिलं. राजे अजूनही नेतोजींकडे पाहत होते. डोळ्यांत राग आणि आगतिकता एकत्रच दिसत होती. नेत्र कडा पाण्यानं ओलावल्या होत्या. पण नजर अजूनही तशीच होती. भेदक. यांनतर पुन्हा राजांची भेट होईल न होईल. नेतोजींनी राजांची मूर्ती हृदयात साठवून घेतली. नेतोजींच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळले.गहिवरल्या स्वरात नेतोजी म्हणाले, "राजं... ह्यो शेवटचा मुजरा राजं... ""आता नेतोजीच्या नावानं पुन्हा मुजरा