अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 14

  • 9.8k
  • 5.1k

शौर्यचा पाय जरा दुखत असल्यामुळे त्याला जागेवरच उठता येत नव्हतं. तो फक्त समीराला जाताना बघत होता. सरांनी शिटी वाजवली तसा शौर्य भानावर आला. प्रॅक्टिस मॅच सुरू झाली. पण बघायला येणारे काही जण लांबुनच बघुन पुन्हा माघारी फिरत होते. कदाचित शौर्य तिथे नसावा म्हणुन.. पण शौर्य आणि इतर मंडळी मॅच बघण्यात गुंतून गेली. आज मात्र मैदानात रोहनच्या नावाचा जप चालु होता. मनवीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. पंचेचाळीस मिनिटांनी प्रॅक्टिस मॅच संपली. टॉनी : "चलो गाईज लेट्स गो टु केंटींग."शौर्य टॉनीचा आधार घेतच उभा राहिला. उजव्या पायावर जास्त जोर न देता टॉनीचा आधार घेत थोडं लंगडतच केंटिंगच्या दिशेने चालू लागला.राज : "एवढं काय आहेरे