लहान पण देगा देवा - 16

  • 5.7k
  • 1
  • 2k

भाग १६ अथर्व आणि त्याचे आजोबा लग्नाच्या तयारीला लागले, पण सगळ्यात मोठी जबाबदारी कोण घेणार याचा प्रश्न मात्र होता. आजोबा आणि अथर्व ने शेवटी ती जबाबदारी आजी कडे दिली, ती जबाबदारी म्हणजे अथर्वच्या आई वडिलांना हे सगळ सांगण आणि त्यांना तयार करण. पण एक दिलासा होता तो म्हणजे संपूर्ण निर्णय हा अथर्वचा होता, आणि आता कितीही कोणीही काही केल तरी तो बदलला जाणार नाही. पण एक होत कि या सर्व गोष्टींचा त्रास साक्षी ला होऊन द्यायचा नव्हता. तिने पहिलच खूप सोसलं होत आणि आता अथर्वला त्यात अजून काहीच भर घालायची नव्हती. पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आजीचा फोन