प्रेमगंध... (भाग - ७)

  • 12.1k
  • 2
  • 6.7k

( आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका तिच्या वर्गात येऊन विचार करत असते. "अशी कशी वागू शकते मी ? एका लग्न झालेल्या माणसावर कसं काय प्रेम करू शकते मी ??? तिला स्वतःलाच ओशाळल्यागत झालं आणि ती स्वतःच्या मुर्खपणावर एकटीच हसू लागली.... आता पुढे... ) आज शनिवार असल्यामुळे शाळा पण लवकर सुटली. तीने पाहिलं तर अर्चना अजयच्या बाईकवरून बसून निघून गेली. राधिकापण चालत बसस्टॉपवर आली. तिलाही लवकरच बस मिळाली. बसमधून येताना ती अजय आणि अर्चनाचाच विचार करत होती. "बरं झालं मला दोघांविषयी माहिती पडलं तर, नाहीतर किती मोठी चूक झाली असती माझ्या हातून." हा विचार करून तीच्या अंगावर भितीने काटाच उभा