( मागच्या भागात आपण पाहिले की, सकाळचा प्रसंग आठवून राधिका आणि अजय दोघेही गालातल्या गालातच हसत होते. ?? दोघांचीही सारखीच अवस्था झाली होती. आता पुढे... ) थोड्या वेळातच शाळेची मधली सुट्टी झाली. पाऊस चालू असल्यामुळे सगळी मुलं वर्गातच बसून राहिली. राधिकाला तर सकाळचा प्रसंग आठवून स्टाफरूममध्ये जाऊच नये असं वाटत होतं. अजयच्या नजरेला नजर कशी द्यावी हेच तीला कळत नव्हतं. ?? पण तिला भूक लागली होती म्हणून तो विचार झटकून ती जायला निघाली. ती स्टाफरूमजवळ आली तसं तिने खिडकीमधून हळूच आतमध्ये डोकावून पाहिलं तर अजयची खुर्ची तिला रिकामी दिसली. आणि अजयच्या बाजूला ती बसायची त्या खुर्चीत दुसरीच कोणीतरी नवीन शिक्षिका