प्रेमगंध... (भाग - ३)

  • 13.3k
  • 1
  • 8.2k

पावसाचे दिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरूच होता. राधिका शाळेत जायला निघाली. तिला असं पावसात चालत जायला खुप आवडायचं. ती बसस्टॉपवर येऊन पोहोचली. काही लोकं शेडमध्ये बसली होती, काही छत्री घेऊन बाहेर उभे होते. पावसाचा जोरपण वाढला होता. राधिका छत्री घेऊन बाहेर उभी राहिली. ☔☔ छत्रीचं पाणी पडायचं ते हातात घेऊन आजूबाजूला उडवत होती. तिच्या चेहर्‍यावर छानशी स्माईल होती.?? तीला खुप मज्जा वाटत होती. ती स्वतःच्या धुंदितच रमली होती. आजुबाजूची काही लोकं तीला बघून गालातल्या गालातच हसत होते. ?? तर काही लोक "इतकी मोठी मुलगी असून लहान मुलांसारखी पाण्यासोबत खेळते." अशा आविर्भावात तीच्याकडे बघत होते.?? तिचं अचानकच आजुबाजूला लक्ष