प्रेमगंध... (भाग - २)

  • 15.4k
  • 10.1k

दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका शाळेत येऊन पोहोचली. ती स्टाफरूममधून रजिस्टर, पुस्तकं वगैरे घेऊन जायला निघाली. ती जायला मागे वळली तशी ती कोणाला तरी जोराची धडकली. ती एकदम घाबरली, तिच्या हातातील पुस्तकं खाली पडली. समोर तिने पाहिलं तर एक उंच, गोरासाच मुलगा तिच्याकडे बघतच उभा राहिला होता. त्याला तसं बघून तिला थोडं आॅकवर्ड फिल झालं. तसं ती त्याला लगेच म्हणाली, "साॅरी सर, ते मी मागे पाहिलं नाही ना. म्हणून चुकुन धक्का लागला माझा." "नाही इट्स ओके होते असं कधी कधी." तो म्हणाला आणि त्याने तिची पडलेली पुस्तकं उचलून दिली. तो- "तुम्ही नवीन आहात का इथे ?" राधिका- "हो मी कालच कामावर