प्रेमगंध... (भाग - १)

(15)
  • 30.4k
  • 3
  • 15.8k

"आई, अगं मी निघते आता, उशीर होतोय मला चल येते मी" ती म्हणाली. तीने देवाला नमस्कार केला. आईने तिला हातावर दहीसाखर दिले. नंतर तीने आई बाबांना नमस्कार केला. तिच्या बहिणी तिला म्हणाल्या, "ताई, आॅल दि बेस्ट" ती म्हणाली, "Thank you." आणि तिने त्यांना छानशी स्माईल दिली.?? आणि ती घराबाहेर पडली. राधिका हि आपल्या कथेची नायिका. दिसायला अगदी सुंदर. उंच गोरीपान, गोलसर चेहरा, ब्राऊन रंगाचे डोळे, कुरळे काळेभोर केस एखाद्या मराठी टिव्ही सिरीयलच्या नायिकेप्रमाणे राधिका सुंदर दिसायची. तिचं राहणीमान अगदी साधं, निर्मळ अशी गोड, प्रेमळ स्वभावाची. ??लहानपणापासून ती खुप समजूतदार होती तेवढीच कष्टाळू पण होती. घरामध्ये तिच्यासोबत तिचे आईवडील आणि तीच्या