प्रकाश जेव्हा निराशावादी बोलत होता. तेव्हा खरं तर रतन पण खचली होती. पण कोणी खंबीर राहणे गरजेच होत.प्रकाश खूपच निराश होता .मनातल सार रतनला सांगत होता ,आपले पुढे असे होणार,मला जर काम नाही झाले तर,आत्ताच कर्ज काढून खर्च भागवतात, सीमाचे बाळंतपण, घरातील खर्च, रमेश तर घरी लक्ष देत नाही , काही काही बोलावे तर..... ........................रतनने प्रकाशाचे सारे बोलणे शांत ऐकुन घेतले, व ती म्हणली, दिवस एक सारखे राहत नाही. जसे रात्री नंतर सकाळ होते, तसे दुःखा नंतर सुख हे येते. आत्ता घरात काही बोलणे