पेरजागढ- एक रहस्य... - २१

  • 7.7k
  • 3.3k

२१)तास आणि गुप्ती महादेव....घोळपाकच्या डोंगरावर चढताना अंगाला चिकटणाऱ्या वनस्पती इथे नव्हत्या पण कुसराचे गवत असल्या कारणाने पायांच्या संपर्कात येताच कापडातून अलगद आत जायचे.आणि त्याचे निमुळते टोक असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्वचेला खुपायचे.त्यामुळे इथे चालताना त्या गवताचा मात्र खूप त्रास व्हायचा.जुत्यांवर असला कुसरांचा जमाव जमा व्हायचा आणि दर दहा पावलांवर मला पाय झटकत राहावे लागायचे.शेवटी कसंतरी करत आम्ही तो मार्गक्रमण केला आणि निघालो.इकडे पाहिजे तेव्हढे दाट जंगल नव्हतं.पण जिथे तिथे असलेले मोकळे मैदान होते. दुरून बघावं तर जंगलामुळे दिसत नव्हते.चालताना जवळच एक मोहफुलाचं वृक्ष दिसलं.ज्याला बघुन "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे "....ही ओळ आठवली.कारण अगदी त्या ओळी प्रमाणेच त्या झाडावर एक पाकळीचा झाड