अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 9

(15)
  • 11.1k
  • 1
  • 5.4k

खुप दिवसांनी आज तो त्याच्या आईला बघणार होता एक वेगळाच उत्साह त्याच्या मनात होता..क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला.. "सॉरी मम्मा ती चार्जिंग संपली मोबाईलची म्हणुन स्विच ऑफ झाला.. तु काही सांगत होतीस मला..", शौर्य फोन उचलल्या उचलल्या त्याच्या मम्माला बोलतो.. अनिता : "आधी मन भरून बघु तर दे तुला.. डोळे असे सुजलेत का तुझे.??नीट झोपत नाहीस का?? हॉस्टेल वैगेरे चांगलं आहे ना??" शौर्य : "हो ग.. मम्मा ... माझा ब्रुनो कुठेय ग??" मम्मा : "हा बघ.. मला माहित होत तु विचारणार त्याच्याबद्दल ते.. म्हणुन मी ह्याला घेऊनच बसली.." (ब्रुनो म्हणजे शौर्यच लाडक अस कुत्र्याचं छोटस पिल्लू. एकदा कॉलेजमधून